अवघ्या जगावर गेल्या अनेक दशकांपासून आपल्या आवाजाची मोहिनी घालणाऱ्या लता मंगेशकर आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. भारताची गानसम्राज्ञी आज ९१ व्या वर्षात पदार्पण करत आहे. दीदींच्या वाढदिवसाच्या दिवशी जगभरातील चाहत्यांचा त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सम्राज्ञीने गायलेली गाणी आजही चिरतरुण आहेत. लता दीदींनी आजवर 30 पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी गायली आहेत. सर्वात जास्त गाणी गाण्याचा गिनीज बुक रेकॉर्डही लता मंगेशकर यांच्या नावावर आहे. लता दीदींच्या आजवरच्या कारगिरीला सलाम म्हणून सरकारनेही 2001मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने सन्मानित केलं. याशिवाय, 1969 मध्ये ‘पद्मभूषण’, 1989 मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ आणि 1999 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते.
#LataMangeshkar #Birthday #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber